पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या ; अजित पवारांची मोदी सरकारकडे मागणी

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) पुन्हा वाढत चालले आहे. पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची (Corona vaccination) परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता अजितदादा केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत. एका वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे .

पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीच ही शिफारस केल्याचा दावा अजितदादांनी केला.

महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात” असं अजित पवार म्हणाले. अशा जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी केल्याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे पवारांकडून स्वागत, दिल्या शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER