कोरोना लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; भारत बायोटेकची घोषणा

Bharat bio tech

नवी दिल्ली : स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे, अशी माहिती ‘भारत बायोटेक’ कंपनीने दिली आहे. ‘लाईव्ह व्हायरल चॅलेंज’ मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे. बायोटेकने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केले आहे. माकडांवर केलेल्या लसीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचे आढळले आहे.

भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून ‘कोवॅक्सिन’ लस विकसित करत आहे. स्वदेशी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी रोखण्यात आली आहे. लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेली कोरोनाची लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अमेरिकेत या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोखण्यात आल्या आहेत.

भारतातही ऑक्सफर्ड लसीची चाचणी  अ‍ॅस्ट्राजेनेका  (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस (Oxford covid-19 Vaccine) मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला होता. या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १७ ठिकाणी सुरू आहे. डीसीजीआयने नोटीस दिल्यानंतर ‘सीरम’ इन्स्टिट्यूटने चाचणी थांबवली आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अमेरिका, ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे. ही लस सर्वांत ‘अ‍ॅडव्हान्स’ असल्याचा दावा केला जात होता. आता ही लस उपलब्ध होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो असे कळते.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER