राष्ट्रपतींनी घेतली कोरोना लस

President Ramnath Kovind

नवी दिल्ली :- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah), केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राजकारणातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना लस टोचून घेतली. या यादीत आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचाही समावेश झाला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आज आर्मी रीसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे.

राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वांत  मोठ्या लसीकरण मोहिमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याच सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मार्चपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी पीडित असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. या वयोमर्यादेत येणारे सर्व ज्येष्ठ नागरिक सरकारी दवाखान्यात जाऊन मोफत लस घेऊ शकतात. त्याचबरोबर ठरावीक खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खासगी दवाखान्यात ही लस २५० रुपयांना घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER