कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षितच; भिती न बाळगता लस घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोना लसीकरणाचा (Corona vaccine) पहिला टप्पा सुरू असून सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeet Chaudhary) यांनी लस घेतली. “कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षितच असून भिती न बाळगता लस घ्यावी”, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी मारूती बोरकर, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आहे. या लसीच्या रिपोर्टनुसार ती प्रभावी आहे. यापुढे महसूल, पोलिस व इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाचा गंभीर दुष्परिणाम झालेला नाही. खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER