अदर पुनावालांनी स्वत: घेतली कोरोनाची लस; व्हिडीओ व्हायरल

मुंबई :- देशात आज कोरोनाच्या लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेला प्रारंभ झाला आहे. जगभर हैदास घातलेल्या कोरोनाचे दिवस आता भरले असं म्हणणे वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala)यांनीही लसीच्या सुरक्षेबाबत खात्री पटवून देण्यासाठी लस टोचून घतेली आहे.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान असल्याचे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो आहे, असं पूनावाला यांनी ट्विट करत म्हटलं आहे. पूनावाला यांनी लस टोचून घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

ही बातमी पण वाचा : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER