कोरोना लसीकरण होणार आधार लिंकिंग

Corona Vaccine Aadhar Linking

नवी दिल्ली :कोरोना प्रतिबंधक लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण ‘आधार’ (Aadhar)लिंकिंग केले जाणार आहे. लस घेणारे आपोआप ‘इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क’शी डिजिटली कनेक्ट होतील तसेच व्हॅक्सिन घेणाच्यांना ट्रॅकसुद्धा केले जाऊ शकेल. आधार कार्ड नसल्यास इतर ओळखपत्र वापरण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.

लसीकरणासाठी देशभरातील अंगणवाड्या, शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये केंद्रे उभारली जाणार आहेत. नव्या वर्षात भारतामध्ये कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत. ‘सिरम’ची लसही याच काळात बाजारात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. संकेत मिळताच केंद्र सरकारही सक्रिय झाले असून, लसीचे वितरण तसेच लसीकरणात प्राधान्य द्यावयाचे समाजघटक ठरविण्यासह अन्य प्राथमिकतांवर सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

तज्ज्ञांच्या गटाने ब्ल्यू-प्रिंटही तयार केली आहे. लस घेणारे आपोआप ‘इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क’शी डिजिटली कनेक्ट होतील तसेच व्हॅक्सिन घेणाच्यांना ट्रॅकसुद्धा केले जाऊ शकेल. आधारकार्डच्या माध्यमातून लसीकरण झाले आहे की नाही, हे कळू शकणार आहे. लसीकरणाच्या यादीत नोंद करून संबंधित व्यक्तीला तिच्या ‘आधार’शी लिंक केले जाईल. त्यामुळे बनावटगिरीची शक्यता उरणार नाही. तसेच कुणाला लस देण्यात आली आहे आणि कुणाला देण्यात आलेली नाही, याबद्दलची माहितीही या मुळे मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER