
मुंबई :- भारतात करोना वॅक्सीनची (Corona Vaccine) तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्या अगोदर, सर्व आवश्यक तयारी झाले आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात करोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (Dry Run) (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे.
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज कोविड-१९ वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन सुरु झालं आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. लसीकरण केंद्र परिसरात आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावून सांगितली. प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासाचे निरीक्षण, चार सूचना अशा पद्धतीनेही मोहीम राबवली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अर्धा तास त्यांना ऑब्झर्व्हेशन रुममध्ये ठेवण्यात येईल. या ठिकाणी टीव्ही, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीला टेन्शन येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
निरीक्षण प्रक्रियेला ॲडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन म्हटले जाते. अर्धा तास थांबल्यानंतर काही जणांना छोटा-मोठा परिणाम जाणवल्यास त्याचे निरीक्षण केले जाईल. इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन अशा तीन पायऱ्या आहेत. कोणाला चक्कर आली, तर त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. इमर्जन्सी म्हणून सीरमच्या लसीला मान्यता मिळाली आहे, परंतु अद्याप ड्रग कंट्रोलची मान्यता अप्राप्त आहे. ती लवकरच मिळेल अशी आशा आहे. जानेवारीत लसीकरण सुरु झाले तरी चार-सहा महिने लागतील. वर्षभरात पूर्णपणे टप्प्याटप्प्याने दोन डोसची लसीकरण मोहीम पूर्ण होईल, असंही टोपेंनी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : नव्या वर्षातील सर्वात मोठी Good news भारतात कोरोना लशीला सशर्त मंजुरी!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला