
मुंबई : महाराष्ट्रात आज ४ हजार ६१० रुग्ण बरे झालेत. २९४९ नवे रुग्ण आढळलेत. ६० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर २. ५६ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइन व ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ७३ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ आहे.
आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८ मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू एक आठवड्यापूर्वी पेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे २५ मृत्यू नाशिक-११, अमरावती-६, पुणे-३, परभणी-२, नांदेड-२, नागपूर-१ असे आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला