कोरोना : आज ४ हजार ३९५ रुग्ण झालेत बरे; ३,४४२ नवे

Corona Updates

मुंबई :- महाराष्ट्रात आज ४ हजार ३९५ रुग्ण बरे झालेत. ३,४४२ नवे रुग्ण आढळलेत. ७० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर २.५६ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६६ हजार ०१० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६० टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ०५९ व्यक्ती होम क्वारंटाइन व ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ७१ हजार ३५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८६ हजार ८०७ आहे.

आज नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ४७ मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मागील आठवड्यातील आहेत.

Check Online PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER