सांगलीत शनिवारी आणखी दोघांना कोरोना

corona virus

सांगली : धारावी येथून सांगली जिल्ह्यात आलेल्यांपैकी आणखी एक बारा वर्षाची मुलगी करोना बाधित झाली असून सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराखाली आयसोलेशन कक्षामध्ये दाखल आहे . सोनारसिद्ध नगर , आटपाडी येथील 55 वर्षीय पुरुष करोना बाधित आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सोनारसिद्ध नगर येथील 2 दोन बहिणी 21 मे रोजी करोना बाधित झाल्या होत्या. या दोघींचे वडील 55 वर्षाचे असून त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शिराळा तालुक्यातील निगडी हद्दीत दि. 26 एप्रिलपासून कंटेनमेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. त्याचा 23 मे रोजी 28 दिवस कालावधी पूर्ण झाला आहे . त्यामुळे शिराळा तालुक्यातील निगडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER