ओशिवरा पोलीस ठाण्यातील १५ पोलिसांना कोरोना

Oshiwara Police

मुंबई :- अंधेरी (पश्चिम) ओशिवरा पोलिस ठाण्याच्या १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास ऑन डयूटी कर्तव्य बजावणा-या पोलिसांनाच आता कोरोनाने वेढलेले दिसते. अंधेरी (पश्चिम) ओशिवरा पोलिस ठाण्याच्या १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे त्यांच्या संपर्कातील ७२ कर्मचारी आणि १५ पोलीस अधिका-यांना आता विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये मुंब्रा, वर्तकनगर, ठाणेनगर, पोलीस मुख्यालय आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER