कोरोना : नव्यांच्या तुलनेत आज दुप्पटपेक्षा जास्त रुग्ण झालेत बरे

Coronavirus-Maharashtra

मुंबई : करोनाबाबत (Corona) राज्यात आज चांगली बातमी म्हणजे १९२७ नवे रुग्ण आढळलेत तर त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे ४०११ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (रिकव्हरी रेट) ९५.३७ आहे.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ३० हजार २७४ वर पोहचली आहे. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४१ हजार ५८६ असून, १९ लाख ३६ हजार ३०५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५१, १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,०६,९९२ नमुन्यांपैकी २० लाख ३० हजार २७४ नमूने (१३.८० टक्के) पॉझिटिव्ह आढळलेत. सध्या राज्यात १ लाख ८९ हजार २८८ जण गृह व २ हजार १२१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER