कोरोना : महाराष्ट्रात एकूण १८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण झालेत बरे

मुंबई :- महाराष्ट्रात मागील २४ तासांत ४२७९ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण १८ लाख ३२ हजार ८२५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) राज्यात ९४.६९ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात नवे ३५२४ रुग्ण आढळलेत. मागील २४ तासांत राज्यात ५९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २८ लाख २३ हजार ८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३५ हजार ६५६ नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६९ हजार ३४८ व्यक्ती होम तर ३ हजार ३१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या ५२ हजार ८४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

आजच्या नव्या ३२५४ रुग्णांसह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ३५ हजार ६५६ झाली आहे. आज नोंद झालेल्या ५९ मृत्यूंपैकी २६ मागील ४८ तासांमधले आहेत. तर उर्वरित १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण ४९ हजार ५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Check PDF :-प्रेस नोट ०१ जानेवारी २०२१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER