कोरोना : राज्यात आज ७ ३०३ रुग्ण झालेत बरे; रिकव्हरी रेट ८९.९९ टक्के

Corona Updates

मुंबई : राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसते आहे. करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात ७ हजार ३०३ रुग्ण बरे झालेत तर नवे ५ ५४८ आढळलेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.९९ टक्क्यांवर पोहचला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासात ७४ रुग्णांच्या मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर २.६२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६७ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९९ रुग्ण गृह तर, १२ हजार ३४२ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५८५ आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १६ लाख ७८ हजार ४०६ वर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER