
मुंबई :- महाराष्ट्रात आज ६ हजार ५३ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. २ हजार ८३४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ८९ हजार ९५८ रुग्ण करोनामुक्त (Corona) झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.२४ टक्के आहे. ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २१ लाख ५७ हजार ९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ९९ हजार ३५२ नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ९३८ व्यक्ती होम क्वारंटाइन तर ३ हजार ५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ९९ हजार ३५२ आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ५५ मृत्यूंपैकी २९ मागील ४८ तासांमधले तर १० मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू गडचिरोली-७, पुणे-५, औरंगाबाद-१, कोल्हापूर-१, नागपूर-१ आणि नाशिक-१ असे आहेत.
Check PDF : प्रेस नोट २१ डिसेंबर २०२०
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला