कोरोना : राज्यात पुन्हा वाढते आहे रुग्णाची संख्या; आज आढळलेत पाच हजार

Corona Virus

मुंबई : राज्यात करोनाच्या संसर्गात वाढ होते आहे. गेल्या काही दिवसांत कमी होत झालेल्या रुग्णांची संख्येत गेल्या तीन दिवसांपासून वाढ होते आहे. आज राज्यात नवे ५,०११ रुग्ण आढळले व १०० रुग्णांचा मृत्यू झाला.

आता राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १७,५७,५२० वर पोहोचली आहे. आज ६,६०८ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली; त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

राज्यात सध्या ८०,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण १६,३०,१११ रुग्ण बरे झाले आहेत. ४६,२०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER