कोरोना : नव्या रुग्णांची संख्या आज किंचित कमी

Coronavirus-Maharashtra

मुंबई :- गेले तीन दिवस राज्यात रोज ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. आज नव्या रुग्णांची संख्या किंचित कमी म्हणजे ६,३९७ आहे. समाधानाची बाब म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे; ५,७५४ रुग्ण बरे झाले आहेत. ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ रुग्ण बरे झालेआहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के व मृत्यूदर २.४१ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती गृहविलगीकरणात आणि ३,४८२ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लसीकरणाचा तिसरा टप्पा

लसीकरणाचा तिसरा टप्पा आज (सोमवार)पासून सुरू झाला. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षे ते ६० वर्षांपर्यंतच्या सहव्याधी (कोमॉर्बिड) व्यक्तींचेही लसीकरण होणार आहे.

पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण निःशुल्क असून खासगी रुग्णालयात कमाल २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER