कोरोना : आता ठाणे पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय शीघ्र कृती दल

Coronavirus- Central Rapid Action Force at thane

ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशातच राज्य सरकारने लावलेल्या संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय शीघ्र कृती दलाची कुमक ठाण्यात दाखल झाली असून, बंदोबस्तालाही लागली आहे.

ही बातमी पण वाचा:- धक्कादायक :राज्यात १८०९ पोलिसांना कोरोनाची लागण

शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसावा यासाठी केंद्रीय शीघ्र कृती दल पाठवण्यात आले आहे. आता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार यात काही शंकाच नाही. या दलाने वागळे ईस्टेट भागातील हाजुरीमध्ये संचलनही केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER