मोठ्ठा दिलासा! भारतीय क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

ऑस्ट्रेलियात (Australia Tour) विनाकारण वादात अडकलेल्या भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket Team) सोमवारी सकाळीसकाळी चांगली बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू आणि संघासोबतच्या इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटीव्ह (Negative Corona Test) आली आहे. त्यामुळे मेलबोर्न येथे गेल्या शुक्रवारी रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत, शुभमान गिल, नवदीप सैनी व पृथ्वी शॉ असे पाच खेळाडू रेस्टाॕरेंटमध्ये गेल्याने वादात अडकलेल्या भारतीय संघाला 7 तारखेला सुरु होणाऱ्या सिडनी कसोटीआधी मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्वांची रविवारी आरटी- पीसीआर चाचणी घेण्यात आली.

चाचणी निगेटिव्ह आलेल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेले रोहित शर्मासह पाच खेळाडूसुध्दा आहेत. या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली असल्याची बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER