कोरोना चाचणी : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह आमदारांना विधान भवनात प्रवेश नाकारला

Prithviraj Chavan denied entry to the Vidhan Bhavan

मुंबई :- कोरोनाच्या साथीमुळे, कोरोना (Corona) चाचणीशिवाय विधान भवनात (Vidhan Bhavan) प्रवेशबंदी आहे. याचा फटका काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना बसला. अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण २० – २५ आमदारांसोबत विधान भवनात आले; पण त्यांनी कोरोनाची चाचणी न केल्यानं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

माजी मुख्यमंत्र्यांनाच विधान भवनात प्रवेश न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सपाचे आमदार अबू आझमी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विधान भवनात प्रवेश करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. ‘दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे काही तरी गोंधळ निर्माण झाला आहे. आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्याने त्यांना विधान भवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणीही अबू आझमी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER