केरळमधील प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य; सरकारचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र आणि केरळ (Maharashtra and Kerala) या राज्यांत कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर आहे. केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी (Corona Test) अनिवार्य केली आहे. याबाबतची सूचना ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt) जारी आली आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाकरे सरकारने केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. तसेच अनेक राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती. केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सूचनांनुसार केरळहून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी हा आदेश बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी प्रवाशांना ७२ तासांत आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल तपासावेत, अशी विमानतळ प्राधिकरणाला विनंती करण्यात आली आहे. तर, रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांना प्रवास करणाऱ्यांकडे ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर रिपोर्ट असणे बंधनकारक आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यात कोरोना मृत्यूंची संख्या वाढली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER