रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात १५ दिवसांत करोना स्वॅब तपासणी लॅब उभारणार

Corona Swab Testing Lab

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथील कोरोना लॅब उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता जिल्हा रूग्णालयात पुढील १५ दिवसांमध्ये करोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. याकरता १कोटी ७ लाखांचा खर्चाला कोविड फंड अंतंर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

कोकणात एकही लॅब नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत होती. या लॅब संदर्भात न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. या साऱ्या घडामोडीचे फलित म्हणून रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात आता कोरोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. पुढील १५ दिवसांत हे काम पूर्णत्वाला जाईल, असे सांगण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER