कोरोना विषय संवेदनशील आहे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन चालणार नाही : संभाजीराजे

Sambhaji Raje

पुणे :- राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) जो निर्णय घ्यायचा आहे तो याच टप्प्यावर घेतला पाहिजे, सहा महिने वगैरे चालणार नाही. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना हे सांगायचे आहे की, इकडचे तिकडे करत जाऊ नका. कमिटीत तुम्ही होते, तर तुम्हाला नीट विषय मांडता का येत नाही? निकाल लवकर लावा. मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात संभाजीराजे भोसले यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि एमपीएससीच्या मुद्द्यांवर भाष्य केले. संभाजीराजे म्हणाले की, “कोरोना विषय संवेदनशील आहे. पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही. एसईबीसी कायदा नसला तरी परीक्षा लांबवून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कमिटी बोलवून निर्णय घ्यावा. २१ मार्चला परीक्षा होणे गरजेचे आहे. मराठा समाजातल्या मुलांचेही हेच म्हणणे आहे.”

विद्यार्थ्यांचा खेळ करू नका…

विद्यार्थ्यांच्या खेळ करू नका, १०२ चे घोडे पुढे करून चालणार नाही. १०२ चा कायदा झाला तेव्हा चव्हाण का बोलले नाही? राज्यसभेत पारित झाले आहे की, राज्याचे अधिकार काढले जाऊ शकत नाहीत. तेव्हा आरक्षणचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. मात्र हा निर्णय राज्याच्याच हातात आहे. सॉलिसिटर जनरलने आरक्षण कायदाच अवैध असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER