कळंबा कारागृहात ८३ कैद्यांना कोरोनाची बाधा

Kalamba Jail - Coronavirus

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) कळंबा कारागृहात (Kalamba Jail)  ८३ कैद्यांना कोरोनाची (Corona) बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार आज (गुरुवार) उघडकीस आला आहे. एकाच वेळी अधिक संख्येने कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कळंबा कारागृह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

अशा वेळी कळंबा कारागृहातील तब्बल ८३ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाने गेल्या ४८ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची  संख्या ७९४ इतकी झाली आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यात नव्याने १ हजार ९०८ कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २५ हजार ९८९ वर गेला आहे.

आजपर्यंत  १६ हजार ४२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृतांमध्ये शहरातील सर्वाधिक १५ जणांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या सर्वाधिक ८ हजार २११ इतकी झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मृत्यूचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याचा धोका अगोदरच वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER