कोरोना : महाराष्ट्रातला स्ट्रेन धोकादायक – एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा (Corona Virus) नवा स्ट्रेन जास्त धोकादायक आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी सांगितले. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ (Heard immunity) मिळवण कठीण आहे, असे ते म्हणालेत. यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोना होण्याची शक्याताही डॉ. गुलेरीया (Dr. Randeep Guleria) यांनी व्यक्त केली.

कोरोनावरील लस या नव्या स्ट्रेनसाठी पूर्णपणे प्रभावी नाही. मात्र, करोना लसीकरणामुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसारावर काही प्रमाणात रोख लावता येईल, असे ते म्हणाले. भारताता आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे २४० रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे. गेल्या आठवड्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत वाढते आहे. दोन शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवीन स्ट्रेन यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही भागात आढळून आला आहे, असे त्यांनी सांगिलते.

कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. हे कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे होते आहे, असा संशय व्यक्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER