कोरोनाने रोखले ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘पठाण’चे शूटिंग

Maharashtra Today

मुंबई, महाराष्ट्र आणि देशात कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटेत सुरु केलेली कोविड जंबो सेंटर्स नंतर बंद केल्याने आता कोविड सेंटर्स आणि अन्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ (Break Tha chain)योजना आखून काही नियमावली तयारी केली आहे. सिनेमाच्या शूटिंगला राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी शूटिंगमध्ये जास्त लोकं नसावीत, शहरातील गर्दीच्या ठिकाणी शूटिंग करू नये, वीकेंडला शूटिंग करू नये असे अनेक नियम लावले आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) आणि ‘पठाण’ (Pathan)सिनेमाचे मुंबईत होणारे शूटिंग शेड्यूल रद्द करण्यात आले आहे.

‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘पठाण’ सिनेमासाठी मोठ्या सेटची आवश्यकता आहे. त्यासाठी स्टुडियोमध्ये सेट बनवण्याचे काम सुरु होते. सेट बनवायला कमीत कमी २५० कामगार लागतात. पण आता कामगारांच्या संख्येवर बंदी घालण्यात आल्याने सेट लावणे निर्मात्यांना शक्य नाही. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’च्या मागे गेल्या वर्षीपासून कोरोना ग्रह लागलेला आहे. गेल्या वर्षी हा सिनेमा तयार होऊन रिलीज होऊ शकला नाही. आता पुन्हा शूटिंगला परवानगी दिल्यानंतर काही दिवस शूटिंग झाले. पण नंतर रणबीर कोरोनाग्रस्त झाला आणि त्याच्यानंतर आलिया भट्टही. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले. पुढील आठवड्यात पुन्हा शूटिंग सुरु होणार होते. पण आता नव्या नियमामुळे आणि सेट तयार होऊ न शकल्याने ‘ब्रह्मास्त्र’चे शूटिंग काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

शाहरुखच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’चे मुंबईत मोठ्या प्रमाणावर शूटिंग सुरु होते. गेल्या आठवड्यात जॉन अब्राहमनेही (John Abraham) शूटिंगमध्ये भाग घेतला होता. पुढील आठवड्यात शाहरुख आणि जॉन एकत्र शूटिंग करणार होते. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्राऊडची आवश्यकता आहे. सरकारच्या नियमामुळे गर्दी जमा करता येत नसल्याने पठाणचे शूटिंगही रद्द करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button