कोरोना : राज्यांना जानेवारीतच दिला होता सावध राहण्याचा इशारा; स्मृती इराणींचे ट्विट

FIR against Smriti Irani in Pune

दिल्ली : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेबाबत जानेवारी महिन्यातच केंद्र सरकारने राज्यांना इशारा दिला होता, असे केंद्रीय बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्यांसंदर्भातील एक बातमीही ट्विट केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डळमळीत झालेल्या आरोग्यव्यवस्थेनंतर देशात राजकारण तापले आहे. राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांना दोष देत आहेत. केंद्राने राज्यांना कोरोनाच्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि कुंभमेळा वाढत्या रुग्णसंख्येसाठी कारणीभूत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे – कोरोनासोबत चाललेल्या या लढाईचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना जानेवारी महिन्यापासून सावधान केले होते.

चाचण्या वाढवण्याच्या सल्ल्यासोबत केंद्र सरकारने वेळीच राज्यांना सतर्क केले होते. सप्टेंबर २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सहा  वेळा बैठका घेतल्या आणि सावधान केले होते. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत २४ वेळा राज्यांना सतर्क केल्याचे भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही सांगितले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button