कोरोना : राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर; आज १६,५७७ रुग्ण झालेत बरे !

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोनाची (Corona) साथ कमी होताना दिसते आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटते आहे. त्याच वेळी, रोज मोठ्या संख्येत रुग्ण बरे होत आहेत. मागील काही दिवसांपासून रोज नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज दिवसभरात राज्यात १६ हजार ५७७ रुग्ण बरे झालेत व १० हजार ८९१ नवीन आढळलेत. २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के आहे व मृत्युदर १.७३ टक्के आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) ‘पॉझिटिव्ह’ आले. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होम तर ६,२२५ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात एकूण १,६७,९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button