महाविकास आघाडी सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना ; दरेकरांचा राऊताना टोमणा

Praveen Darekar-Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात भाजपचा उल्लेख ब्लॅक फंगस केल्यानंतर दोन्ही पक्षात वातावरण पुन्हा तापल आहे. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारला ‘ जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना’ म्हटले आहे.

दरेकर यांनी ट्विट केले – श्रीमान संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत! पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये दरेकर म्हणतात – महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे? आश्चर्य आहे!

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button