शेअर बाजारावर कोरोनाचे सावट कायम; घसरण सुरूच

corona-Sensex stock market-Starting to fall

मुंबई :- शेअर बाजारावर कोरोना व्हायरसचे सावट कायम आहे. आज सकाळपासून बाजारात विक्रीचा दबाव होता. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११० अंकांची घसरण झाली.

रामनवमीनिमित्त गुरुवारी शेअर बाजार बंद होते. आज पुन्हा बाजार सुरू झाले. देशांतर्गत कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. पुढे याचा मोठा फटका विकासदराला बसणार आहे. विकासदर चार टक्के किंवा त्याहून खाली येईल, असा अंदाज संस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

आज बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रीचा जोर होता. मार्चमध्ये वाहन विक्रीत मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज ऑटो शेअर्सची जोरदार विक्री केली. टाटा मोटर्स, बजाज ऑटो , हिरो मोटर्स काॅर्प, टीव्हीएस, अशोक लेलँड आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे. दरम्यान टेलिकाॅम शेअर्सला मागणी आहे. बँकिंग शेअरवर दबाव आहे.


Web Title : sensex stock market starting to fall due to corona

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)