कोरोना, सॅनिटायझर… यंदाची दिवाळी फटाक्याविना? BMC लवकरच घेणार मोठा निर्णय

BMC & Diwali

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सरकार नागरिकांना उद्युक्त करत आहे. त्यातच आता लवकरच दिवाळी  येऊ घातला आहे. दिवाळीला सर्वांत  मोठे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांविना दिवाळी अपूर्ण मानली जाते.

मात्र, यंदा मुंबई महापालिका दिवाळीला फटाक्यावर बंदी आणण्यासाठी विचारविनिमय करत असल्याची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यावर यंदा निर्बंध घालण्यात येणार असल्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दिवाळीच्या (Diwali) काळात मुंबईत (Mumbai) सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यांवर फटाके (fire cracker) फोडण्याची परंपरा आहे. मात्र, याबाबत मुंबई महापालिका (BMC) लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षीची दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका. सोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका.

हाताला सॅनिटायझर लावू नका. अन्यथा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे आवाहन मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने मुख्य अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी केला आहे. दुसरीकडे, सध्या कोविड-१९ चा काळ असल्यानं प्रदूषणात भर पडून लोकांना त्रास होऊ नये, यामुळे फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईसह राज्यभरात जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER