सीरमचे संस्थापक मित्र कोरोना लस घे म्हणाले; पण मी घेतली नाही, कारण… – शरद पवार

Sharad Pawar - NCP

मुंबई :  सीरम कंपनीच्या (Serum Institute) संस्थापकांनी विनंती करूनही आपण कोरोना लस न घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली . तसेच यामागील कारणही नमूद केलं.

पवार म्हणाले, मला सीरमच्या संस्थापकांनी कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेण्यास सांगितले; पण मी त्यांना आधी नगरला जाऊन येतो आणि तेथील परिस्थिती पाहून नंतर गरज वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो. सीरमला आग लागली; मात्र सुदैवाने कोरोनाच्या औषधांना काही झाले नाही.

सीरमचे संस्थापक माझे मित्र आहेत. ते काही दिवसांपूर्वी म्हणाले, बीसीजीचे इंजक्शन घे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. आता पुन्हा गेलो होतो तर कोरोना लस घे म्हणाले. अशी माहिती पवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER