कोरोनाचे नियम शिवसेनेसाठी नाहीत? काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकींचा टोमणा

Zeeshan Siddiqui

मुंबई : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि शिवसेना सोबत असले तरी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसले. काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या मतदारसंघात एका लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांना आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी फोटो पोस्ट करत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनात होणाऱ्या गर्दीवरून – कोरोनाचे नियम शिवसेनेसाठी नाहीत, असा टोमणा मारला.

वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्विट केले – राज्यात सगळीकडे कलम १४४ लागू करण्यात आले असताना शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मात्र लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी गर्दी करतात. म्हणजे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत आणि शिवसेनेसाठी नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

लसीकरण केंद्रामध्ये केवळ एका जणाला लस दिली जाते आहे. मात्र अनेक लोक फोटो काढत आहेत, असे म्हणून त्यांनी या लसीकरणावर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, आदित्य ठाकरे आणि मुंबई मनपाला टॅग केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button