करोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा; सरकारी धोरणांविषयी नाराजी

Maharashtra Today

मुंबई : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील(Shahid Jamil) यांनी राजीनामा दिला(Corona research group chief resigns) आहे. भारतामधील करोना विषाणूंच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला आहे. जामील हे या गटाचे प्रमुख होते. अनेक विषयांवर जामील यांची मत सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती. ते या गटाचे प्रमुख असेल तरी सरकारच्या धोरणांवर काही दिवसांपासून टीका करत होते.

देशामध्ये करोना विषाणूचे अनेक प्रकार आढळून आल्यानंतर जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आली. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी नमूने गोळा करुन दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास करण्यात येतो.

जानेवारीत हा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती ती नंतर वाढवण्यात आली. भारतामधील जिनोम रचना अभ्यास आणि संशोधनाच्या कामाला आयएसएसीओजीच्या स्थापनेनंतर वेग आला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जामील म्हणाले होते की, “सरकारी यंत्रणांना करोना जानेवारीमध्ये संपला आहे असे वाटले आणि त्या बेजबाबदार झाल्या. त्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेले अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केले.”

नुकताच त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’साठी लेख लिहिला होता.त्यात चाचण्यांची संख्या वाढवणे आणि लोकांना आयसोलेट करण्याचे प्रमाण वाढवण्याची शिफारस केली होती. तसेच, देशामध्ये तात्पुरत्या स्वरुपात अधिक बेड्स आणि इतर सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. निवृत्त डॉक्टर आणि नर्सची मदत घेतली पाहिजे, पुरवठा साखळी मजबूत करुन औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, असे म्हटले होते. मात्र या उपाययोजनांना पुराव्यावर आधारित धोरण तयार करणाऱ्याला यंत्रणांकडून विरोध केला जातो. आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे हा आणखीन एक गोंधळ देशात आहे. देशामधील करोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, ते म्हटले होते.

जामील यांनी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचाही विरोध केला होता. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा निर्णय त्यांना पटला नव्हता. ते म्हणाले होते – हे खरोखरच दुर्देवी आहे. आपल्याकडे आधीच डॉक्टर्सची कमतरता आहे. त्यात आपण आपल्या सर्वात चांगल्या डॉक्टरांना तुम्ही ऑक्सिजन-ऑक्सिजन खेळा असे सांगितले आहे. तुम्ही ठरवा कोणाला ऑक्सिजन दिला पाहिजे. आमच्यासाठी हा दुख:द दिवस आहे. हे डॉक्टर्स त्याच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र ऑक्सिजन आणि त्याचा पुरवठा आणि आकडेवारीसंदर्भात त्यांना काय माहित आहे ? असा प्रश्न जामील यांनी विचारला होता.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button