कोरोना : वेगवान चाचणींसाठी रिलायन्सने इस्रायलकडून खरेदी केले तंत्रज्ञान

Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) रुग्णांचा शोध घेण्यासाठी वेगाने चाचण्या व्हायला पाहिजेत. यासाठी चाचणीचे निदान त्वरित झाले तर चाचणीचा वेग वाढू शकतो. या दिशेने रिलायन्सने मोठे पाऊल उचलले आहे. इस्रायलच्या ‘ब्रेथ ऑफ हेल्थ’ (BOH) शी करार केला आहे. ब्रेथ ऑफ हेल्थने कोरोनाचे निदान काही वेळेत करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

ब्रेथ ऑफ हेल्थच्या तज्ज्ञाना भारतात येऊ द्या, ही रिलायन्सचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची विनंती सरकारने मान्य केली आहे. एका वृत्त संस्थेने म्हटले आहे की, ब्रेथ ऑफ हेल्थच्या तज्ज्ञांची टीम भारतातील रिलायन्सच्या टीमला आपल्या प्रशिक्षण देतील. या प्रणालीद्वारे लोकांची आणि रूग्णांची सुरूवातीच्या टप्प्यातच ओळख पटवता येईल. ही नवी प्रणाली अवघ्या काही सेकंदात निदान देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button