मुंबईत कोरोनाचा पुन्हा शिरकाव इमारती सिल करायला सुरुवात

Mumbai

मागच्या आठवड्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई महापौर आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन पुन्हा केलं जावू शकतं याच्या शक्यता वर्तवल्यात. वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या ही मुंबईतली कोरोनाची दुसरी लाट तर नाही ना? असे प्रश्न वारंवार विचारले जातायेत.

मुंबईत कोरोनाप्रतिबंधासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात झाली असून काही भागातील इमारतींना सिल केल जातंय.

मुंबईत इमारतींना देण्यात आलीये नोटीस

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी मुंबई मनापने मोठा निर्णय घेतलाय. एकाच इमारतीत दहापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले तर ती इमारतच सील करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिलीये. मुंबईतील कोरोना प्रसाराच्या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी परिस्थीतीची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

मुंबई मनपाच्या निर्णयानूसार घरात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास घर अंशीक रुपात सील करण्यात येईल तर एकाहून अधिक रुग्ण आढळल्यास किंवा एखाद्या मजल्यावर रुग्णांची संख्या आढळल्यास फक्त मजल्यास सील करण्यात येईल. पूर्ण इमारतीला सील करण्याची गरज भासणार नाही असं ही ते म्हणालेत.

दरम्यान सहाय्यक आयुक्तांकडे पुर्ण इमारत सील करायची की नाही या संबंधीचे अधिकार असतील. जर एखाद्या विशिष्ट मजल्यावर कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येत नसेल तर संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय आयुक्त घेऊ शकतात.

पालिकेकडून नोटीस

मुंबईच्या विविध भागात पालिकेकडून नोटीसा देण्यात आल्यात, ज्या भागात कोरोनाचं संक्रमण वाढताना दिसतंय अशा भागात काही मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात आलीयेत.

सोसायटीत येणाऱ्यांची संख्या कमी होईल, मर्यादीत ठेवता येईल याचा विचार करावा. ऑक्सीजन लेव्हल आणि तापमान तपासावं. कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांना १४ दिवस क्वारंटाइमध्ये ठेवावं. आणि हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करावी अशा गोष्टी सांगण्यात आल्यात.

कोरोनाशी लढायला पुणे मनपा सज्ज.

मुरलीधर मोहोळ महापौर पुणे मनपा यांनी कोरोना विषयक आढावा बैठक घेतली. आणि नागरिकांना सुचना दिल्यात. “मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हिटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.” असं मत त्यांनी बैठकीनंतर व्यक्त केलं.

“संसर्ग वाढत असलेल्या चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु केली जात आहेत. आरोग्य विभागाला पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. सर्व प्रकारचे 1 हजार 163 शासकीय बेड्स सज्ज आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. मास्कसंदर्भातील कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

सामुहिक कार्यक्रम मर्यादीत संख्येन घेण्याच्या सुचना

वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई मनपानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीये. लग्न समारंभात फक्त ५० नातेवाईकांना परवानगी देण्यात आलीये. त्याहून जास्त लोक आढळले तर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल्स आणि इतर ठिकाणी जिथं माणसं जमतात तिथंही हे निर्बंध लागू असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER