राज्यात कोरोनाने चिंता वाढवली; आज ४७ हजार २८८ नवे कोरोनाबाधित, १५५ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus

मुंबई :- राज्यात कोरोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायाल मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील दररोज कोरोनाबाधित (Corona) मोठ्यासंख्येने आढळतच आहेत. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ कोरोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज २६ हजार २५२ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button