स्थानिक आमदार निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आ. निकम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Shekhar Nigam-Laxami narayan Mishra

रत्नागिरी(प्रतिनिधी):  कोरोना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक साहित्य स्थानिक आमदार निधीतून तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक साहित्य करता आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. चिपळूण तालुक्यासाठी सात व संगमेश्वर तालुक्यासाठी पाच इतके इन्फ्रारेड थर्मामीटर आवश्यक असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER