आर्वीत कोरोना पॉझिटिव्ह महिला

Corona Positive

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पारवा येते आर्वी येथे एक एक वरून कोरोना पॉझिटिव्ह महिला आढळल्याने खळबळ उडाली आहे ही 24 वर्षीय महिला अकोल्याहून आर्वीला माहेरी 24 मे रोजी आली होती हे कुटुंब सिंधी कॅम्प परिसरात राहते त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे या 24 वर्षीय महिलेला एक महिन्याचे बाळ आहे.

दरम्यान वर्धा जिल्हा ग्रीन झोन असल्याचा तुरा घेऊन फिरत असताना बाहेरून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरने सुरू केले. गेल्या दोन दिवसात चार कोरोना रुग्ण आढळुन आल्याने आता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. गावात आलेला कोरोना घरात कधी शिरेल हे सांगता येत नाही. जिल्हा प्रशासनाच्या सुचनेचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे तसेच रेड झोन मधून येणारे नागरिक कोरोना बाधित निघत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER