खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली ; नागपूरच्या रुग्णालयात दाखल

Navneet Rana

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांतील १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER