कोरोना झाल्यावर १६ पैकी एकही मंत्री फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात दाखल का नाही? भाजप नेत्याचा सवाल

Atul Bhatkhalkar-Devendra fadnavis

 मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग करोनाची लागण झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने ही हिंमत का दाखवली नाही असा प्रश्न अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी विचारला आहे.

दरम्यान फडवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सरकारी रुग्णालयात दाखल होतील. त्यांची करोना चाचणी दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आता यावरुन भाजपाने सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘काळ्या टोपीखाली मेंदू असतोच पण सत्तेसाठी हिंदुत्व सोडत नसतो’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER