खळबळजनक : जयसिंगपूरमध्ये डॉक्टरची वृद्ध आई कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३६ नवे रुग्ण आढळले. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २०७ आहेत. जयसिंगपूर शहरात काल शनिवारी कोरोनाने एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि त्याच्या संपर्कातील कामगारही कोरोनाबाधित आढळला आहे. त्यापाठोपाठ आज शहरातील एका डॉक्टरची वृद्ध आईच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे . त्यामुळे प्रशासनाने शहरात अत्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेली वृद्ध महिला तिसर्‍या गल्लीत राहणारी आहे. तिचा मुलगा डॉक्टर असून त्याचा दवाखाना नांदनी रस्त्यावर आहे. त्यामुळे या डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डॉक्टरची वैद्यकीय तपासणी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र त्याचा रिपोर्ट उद्या मिळणे अपेक्षित आहे. आज कोरोनाबाधित आढळलेली वृद्ध महिला गेले आठ दिवस आजारी होती . तिच्यावर तिचा डॉक्टर मुलगाच उपचार करीत असे. काल त्याने आईला कोल्हापूर येथे सीपीआरमध्ये घेऊन आपली तसेच आईची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली. आज सायंकाळी आईच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला.

तो पॉझिटिव्ह आला आहे. हे समजताच पालिका प्रशासनाने तिसऱ्या गल्लीचा परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून आरोग्य विभागातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी टिना गवळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER