कोरोना; पवारांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु, सुप्रिया सुळेंनी दिली ही माहिती

Sharad Pawar

मुंबई : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून, आज राज्यात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक शहरात कठोर निर्णय घेत प्रतिबंध घातले आहे. करोनाचं संकट आक्राळविक्राळ होत चाललं आहे. झपाट्यानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. त्यामुळे आज (२२ मार्च) सगळीकडं कर्फ्यू पाळला जात आहे. या कर्फ्यूच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांचा फोटो शेअर केला आहे.

करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहे. बसमधील गर्दी कमी करण्याबरोबरच आता लोकल सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.

राजस्थानने घोषित केले ‘लॉकडाऊन’

राजकीय नेत्यांकडूनही लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. लोकांनी शक्य होईल तितका सामाजिक जीवनातील वावर कमी करावा, असं नेत्यांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब घरी बसून काय करतंय याची माहिती सोशल मीडियातून नागरिकांना दिली आहे. त्याचबरोबर लोकांनी घरी बसून करोनाच्या प्रसाराला आळा घालावा, असं आवाहनही केलं आहे.`

पवार हे घरी कागदपत्रे वाचतानाचा आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार मोबाईल पाहतानाचा फोटो त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद हे देखील वाचन करत असतानाचा फोटो त्यांनी सोशल मिडियात शेअर केला आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असे सरकार वारंवार सांगत आहे. त्याचे स्वतः पालन पवार यांचे कुटुंबीय करत आहे. सुळे यांनी यासोबत नागरिकांनाही आवाहन केले असून कोरोनाच्या साथीचा आपण एकजुटीने मुकाबला करू. केंद्र व राज्य सरकार यासाठी चांगले प्रयत्न करत असल्याचे प्रशस्तिपत्रक सुळे यांनी या निमित्ताने दिले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.