कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात, पण श्रेय कुणाचे? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . या संकटमय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची  पावले उचलली. कोणतेही काम असो त्यात श्रेयवादाची लढाई ठरलेली. महाराष्ट्र दुसऱ्या लाटेशी लढतोय, झगडतोय, सावरतोय या लढाईला आता यश येताना दिसतंय. दुसऱ्या लाटेतही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, याचं श्रेय कुणाचं? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या उत्तराने त्यांनी सर्वसामन्यांची मने जिंकली आहेत.

कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही; पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचं हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत आणि कुशल आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे.

तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत; पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button