साता-यात कोरोनाचा धोका वाढला; शनिवारी 40 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

Covid-19

सातारा: सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा धोका वाढला आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 40 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी एकाही रुग्णाचा रिपोर्ट न आल्याने जिल्ह्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 40 जणांचा कोरोना अहवाल आल्यानंतर सातारकरांच्या मनातील धाकधूक वाढली आहे.

सातारा जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २४१ वर पोचली आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा पुन्हा निर्बंधाच्या कचाट्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही बातमी पण वाचा:- औरंगाबाद : २३ कोरोनाबाधितांची वाढ, रुग्णसंख्या १२४१

४० जणांच्या अहवालात पाटण, कऱ्हाड, सातारा आदी तालुक्यातील बाधितांचा समावेश आहे. यात पाटण तालुक्यातील 15, कऱ्हाड तालुक्यातील सहा बधितांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील डेरवन येथील दहा महिन्याच्या बालक कोरोना मुक्त झाल्यानंतर पाटण तालुका कोरोना मुक्त बनला होता. मात्र, बनपुरी, धामणी आदी सह आज नव्याने १५ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

नव्याने सापडलेल्या या रूग्णांमध्ये तालुक्यातील म्हासोली, पाटणसह खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा, पिंपोडे, वाई तालुक्यातील वासोली, सातारा मधील शाहूपुरी, जकातवाडी, खावली येथील रुग्णांचा समावेश आहे.बहुतांश रुग्ण मुंबई, जळगाव आदी ठिकाणाहून प्रवास करून आलेले समजते.

तर, शनिवारी आलेल्या अहवालात लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे. तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER