
मुंबई :- महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे २९४० रुग्ण आढळले. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६५,१६८ झाली आहे. आज १ हजार ८४ रुग्ण बरे झालेत. राज्यात एकूण २८,०८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा २१९७ झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण गेल्या आठवड्यात ११.३ दिवस होते ते आता १७.५ दिवस झाले आहे. देशात हे प्रमाण १७.१ दिवस आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७ टक्के आहे.
रुग्णांच्या आकडेवारीचा तक्ता –
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला