कोरोना रुग्णांना अ‍ॅडमिट होण्यासाठी रिपोर्टची गरज नाही; केंद्राचे निर्देश

Coronavirus Patient Test Report

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना (Corona) रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही, असे निर्देश केंद्राने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दिले आहे.

संशयित व्यक्तीलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे. कोरोना रुग्ण कोणत्याही शहराचा असला तरीही त्यांना रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे. रुग्णालयात वैध ओळखपत्र नाही म्हणून रुग्णांचा प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार रुग्णांना रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असे नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button