दिलासा : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येला उतार

Sangli Coronavirus

सांगली : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 299 व्यक्ती कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आल्या, तर 19 व्यक्तींचा मृत्यू झाला. दिवसभरात 795 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. रुग्णसंख्येला उतार लागल्याने व मृत्यूची संख्या कमी झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 38 हजार 817 झाली आहे. आजअखेर एकूण 31 हजार 301 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या 6 हजार 94 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 4 हजार 432 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. उपचाराखालील 862 व्यक्ती अतिदक्षता भागात आहे. रविवार अखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 1 हजार 422 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

दरम्यान, सांगली महापालिका क्षेत्रात रविवारी 68 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 36 आणि मिरजेतील 32 व्यक्तींचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील 29, जत तालुका 20, कडेगाव तालुका 30, कवठेमहांकाळ तालुका 29, खानापूर तालुका 6, मिरज तालुका 22, पलूस तालुका 13, शिराळा तालुका 21, तासगाव तालुका 19 आणि वाळवा तालुक्यातील 42 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER