कोरोना : ‘या’ शहरात रुग्णांची घरे करणार सील

Home Quarantine

औरंगाबाद : राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. औरंगाबाद येथेही स्थिती बिघडली आहे. कोरोनाच्या रुग्णांची माहिती देण्यासाठी रुग्णांची सील करून घरांवर स्टिकर लावणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती देण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद महापालिकेने दिली.

कोरोनाची लस आल्यामुळे सर्व काही पुर्वीसारखे सुरू झाले होते. पण त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसतो आहे. औरंगाबद पालिका आता अॅक्शन मोडमध्ये असून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने पसरतो आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER