मासेमारीचा १ ऑगस्टचा मुहूर्त हुकला श्रावण, कोरेाना महामारी, जागतिक तणावाचा परिणाम

Fishing

रत्नागिरी :- कोरोना(Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला श्रावण महिना, भारत आणि चिन यादोन देशातील तणावपूर्ण वातावरण, मुंबई(Mumbai) मार्केटमध्ये कमी झालेली मागणी आदी कारणाने कोकणातील मासेमारी बॅकफुटवर आली आहे. दरवर्षीचा १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त यंदा हुकल्याने नौकामालक चिंताग्रस्त आहेत.

समुद्री मासेमारीवर असलेले शासकीय निर्बंध 31 जुलैच्या रात्री संपुष्टात आले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारीला मुभा मिळाली आहे. मात्र विविध संकटांचा सामना करणाऱया कोकणातील बहुसंख्य मासेमारांनी पहिल्या दिवशी आपल्या नौका समुद्रात लोटलेल्या नाहीत. जगभरातील कोरोनाचे संकट व भारत-चीन संघर्षाचा मोठा फटका कोकणातील (Konkan) मासेमारीला बसला आहे. भारत व चीन तणावामुळे दोन्ही देशातील वाहतूक बंद असून चिनी बाजारपेठेत कोकणातून जाणारी मासळी बंद झाली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे स्थानिक बाजारातही माशांना उठाव नाही. कोकणातील समुद्रात मोठय़ा प्रमाणात मिळणारा राणी मासा, बोंबील, बगे व इतर छोटय़ा मासळीला चीनच्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. येथील दलाल हे मासे लिलावात खरेदी करून ते मुंबई येथील प्रक्रिया केंद्रात पाठवतात. तेथे ते हवाबंद करून चीनी बाजारपेठेत पाठवले जातात. तर मोठय़ा माशांना आशिया व युरोपीय देशांमध्ये मागणी असते. मात्र सध्या जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने या निर्यातीला ‘ब्रेक’ लागला आहे.

रत्नगिरीतील हर्णे बंदर उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, डहाणू येथील सुमारे 10 ते 12 हजार खलाशांना रोजगार पुरवते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावी परतलेले खलाशी अद्याप दापोलीत आलेले नाहीत. इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना डिझेल परतावाही मिळालेला नाही. यामुळे येथील मच्छीमार मोठय़ा संकटात सापडला आहे. त्यात भरीस भर म्हणून मुंबई येथील भाऊचा धक्का येथील मासेमारी संघटनांनी 1 सप्टेंबरपर्यंत मासेमारी हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणातील माच्छिमार संकटात सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER